पुणे शहर

डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रिया सोपी करून सदनिका धारकांची पिळवणूक थांबवावी : भाजप सहकार आघाडीची मागणी..

भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्याकडून सहकार आयुक्त अनिल कवडे यांना निवेदन..

पुणे : pune city गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या जागेवरील मालकी हक्क मिळविण्यासाठी किंवा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मानीव अभी हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण करावी लागते . परंतु सरकारी स्तरावर असलेली ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असुन ती पूर्ण करण्यासाठी अवाजवी शुल्काची मागणी मध्यस्थामार्फत होत असल्याने गृहनिर्माण सोसायट्या डीम्ड कन्व्हेयन्स करायला पुढे यायला धजावत नाहीत. त्यामूळे सहकार विभागाने या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणावा व  सदनिका धारकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी भाजप सहकार आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील मागणीचे निवेदन भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्याकडून सहकार आयुक्त अनिल कवडे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दशरथ दांगट, उपाध्यक्ष निळकंठ शेळके , राजीव लुल्ला , शिवाजीनगरचे अध्यक्ष प्रशांत लाटे , मनिषा ढोले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
  

मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया फक्त ८ पेपर वर आणुन ठेवल्याने सांगत वरील विषयी सर्व अधिका-यांची बैठक बोलावून समन्वय साधण्यात येईल असे आश्वासन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले .

सहकार आघाडीचे वतीने डीम्ड कन्व्हेयन्स बाबत जनजागृती करून याबाबत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र गेले वर्षभरापुर्वी चालु केले असुन याबाबत सोसायट्यांनी संपर्क साधावा आणि आपली आर्थीक फसवणुक टाळावी असे आवाहन सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दांगट यांनी केले आहे .

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये