पुणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेतील प्रभागांच्या नावांची यादी जाहीर

रात्री बारा वाजता जाहीर होणार प्रभाग रचना
पुणे : पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेतील 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत शहरातला पहिला प्रभाग हा धानोरी विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा 58 क्रमांकाचा प्रभाग कात्रज गोकुळ नगर आहे.विशेष म्हणजे नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही दहा प्रभाग तयार झालेले आहे.
तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्ष नेते व पदाधिकाऱ्यांची प्रभाग सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे.महापालिकेची प्रभाग रचना कशी असणार याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून लागलेली होती. पुणे महापालिकेतर्फे रात्री बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करून दिली जाणार आहे. तेथे प्रभाग रचना नाव व चतूसीमा नकाशा नागरिकांना पाहता येणार आहे त्यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर आज केवळ प्रभागांची नावे जाहीर झाल्याने प्रभाग कसा असू शकतो याचा अंदाज लावणे शक्य झाले आहे
जाहीर प्रभागांची नावे
१ धानोरी विश्रांतवाडी
२ टिंगरे नगर संजय पार्क
३ लोहगाव विमान नगर
४ वाघोली युवान आयटी पार्क
५ खराडी चंदननगर
६ वडगाव शेरी
७ कल्याणीनगर नागपूर चाळ
८ कळस फुलेनगर
९ येरवडा
१० शिवाजीनगर गावठाण संगमवाडी
११ बोपोडी पुणे विद्यापीठ
१२ औंध बालेवाडी
१३ बाणेर सुस म्हाळुंगे
१४ पाषाण बावधन बुद्रुक
१५ पंचवटी गोखलेनगर
१६ फर्ग्युसन कॉलेज एरंडवणे
१७ शनिवार पेठ राजेंद्र नगर
१८ शनिवारवाडा कसबा पेठ
१९ रास्ता पेठ केईम हॉस्पिटल
२० पुणे स्टेशन ताडीवाला रोड
२१ मुंढवा घोरपडी
२२ मांजरी शेवाळवाडी
२३ साडेसतरानळी आकाशवाणी
२४ मगरपट्टा साधना विद्यालय
२५ हडपसर गावठाण सातववाडी
२६ भिम नगर रामटेकडी
२७ कासेवाडी हरका नगर
२८ महात्मा फुले स्मारक टिम्बर मार्केट
२९ खडकमाळी महात्मा फुले मंडई
३० जय भवानीनगर केळेवाडी
३१ कोथरूड गावठाण शिवतीर्थनगर
३२ भुसारी कॉलनी सुतारदरा
३३ बावधन खुर्द महात्मा सोसायटी
३४ वारजे कोंडवे धावडे
३५ रामनगर उत्तम नगर शिवणे
३६ कर्वेनगर
३७ जनता वसाहत दत्तवाडी
३८ शिवदर्शन पद्मावती
३९ मार्केट यार्ड महर्षी नगर
४० गंगाधाम सॅलिस्बरी पार्क
४१ कोंढवा खुर्द मिठा नगर
४२ सय्यद नगर लुल्ला नगर
४३ वानवडि कौसर बाग
४४ काळेपडळ ससाणेनगर
४५ फुरसुंगी
४६ मोहम्मद वाडी उरळी देवाची
४७ कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
४८ अप्पर सुपर इंदिरानगर
४९ बालाजी नगर के के मार्केट
५० सहकारनगर तळजाई
५१ वडगाव पाचगाव पर्वती
५२ नांदेड सिटी सन सिटी
५३ खडकवासला नऱ्हे
५४ धायरी आंबेगाव
५५ धनकवडी आंबेगाव पठार
५६ चैतन्य नगर भारती विद्यापीठ
५७ सुखसागर नगर राजीव गांधी नगर
५८ कात्रज गोकुळ नगर




