पुणे शहर
कर्वेनगरमध्ये जय मातादी नवरात्र उत्सव संस्थेत महाआरती व सामाजिक उपक्रम

कर्वेनगर :जय मातादी नवरात्र उत्सव संस्था, कर्वेनगर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आई जगदंबेची महाआरती क्रांतिकारी शेतकरी नेते रविकांत तूपकर तसेच जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्रद खेडेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमात धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक भान जोपासत संस्थेच्या वतीने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे उत्सवाला सामाजिकतेची जोड मिळाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन फोलाने, बंटी निढाळकर, सचिन वाडकर, मीना मोरे, संतोष वरक, वैशाली दिघे, भाग्यश्री निढाळकर, अशोक कदम, सागर फाटक, योगेश खरात तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
