आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शिवसंग्राम ची पुण्यात आढावा बैठक..

पुणे : विधान परिषद अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर आवाज उठवणारे आमदार विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पुणे शहराच्या वतीने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सत्कार करण्यात आला.
शिवसंग्राम पुणे शहर , जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडली. यावेळी आगामी पुणे महानगरपालिका, जिल्हापरिषद, आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड, तुषार काकडे, शेखर पवार, समीर निकम, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, संगीता घुले व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Against the backdrop of the upcoming Pune Municipal Election. Review meeting of Shiv Sangram in Pune ..

या बैठकीत शिवसेनेतील आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. यावेळी विनोद शिंदे यांच्यावर पुणे शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सायली सहानी यांची पुणे शहर युवती अध्यक्षपदी तर मीना मोरे यांची कोथरुड विधानसभा अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली.


