महाराष्ट्र

१५ फेब्रुवारीच्या त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख यांनी केला हा खुलासा…

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. सचिन वाझे आणि देशमुख यांच्या भेटीवरून प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना १५ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख हे विलगिकरणामध्ये असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपाचे खंडन करत त्या पत्रकार परिषदे बाबत अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. Anil Deshmukh made this revelation about the press conference on 15th February

मला कोरोना झाल्याने मी नागपूरमधील हॉस्पिटल मध्ये ५ ते १५ फेब्रुवारी पर्यंत अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज घेऊन बाहेर पडत असताना अनेक पत्रकार गेटवर उभे त्यांना मला प्रश्न विचारायचे होते. पण मी नुकताच कोविड मधून बाहेर आलो असल्याने माझ्या आंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खुर्चीवर बसून मी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व तिथून लगेच गाडीत बसून घरी जाऊन १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. याबाबतचा व्हिडिओ देशमुख यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

Img 20210319 wa0097

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये