आरोग्य

डाॅक्टर ते रूग्ण व्हाया फार्मसिस्ट ; एक महत्वाचा थांबा : डॉ सचिन नागापूरकर

जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त..

आज जागतिक फार्मसिस्ट दिन (international pharmacist day) आहे. 2009 इस्तंबूल येथील बैठकी पासून जागतिक फार्मसिस्ट दिन 25th सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. डाॅक्टर व रूग्ण ह्यांच्या मधील एक दुवा,एक मह्त्वाची साखळी चे काम हे फार्मसिस्ट करतात.  जगभरातील फार्मसिस्ट चा इतिहास जर बघितला तर साधारणपणे शके 800 कालावधी पासून उल्लेख आढळतो.

Louis Joseph…जगातील पहिला फार्मसिस्ट म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो. जगभरात फेमस फार्मसिस्ट चा उल्लेख करावयाचा झाला तर 1)Alexander Flemming ज्यांनी Penicillin चा शोध लावला.2) John Perberton ह्यांचे योगदान म्हणजे Coco Cola कंपनी व पेय 3) Hubert Humphrey हे अमेरिकेचे Vice President होते. 4) Friedrich Serturner ज्यांनी Morphine चा शोध लावला.

असे बरेच फार्मसिस्ट होऊन गेले व त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय झाले. बऱ्याच वेळा जेव्हा रूग्ण डाॅक्टरांची औषधांची चिठ्ठी घेऊन ती औषधाच्या दुकानात जातो त्यावेळी डाॅक्टरांच्या चिठ्ठी वर Rx..असे लिहीलेले असते. Rx हा लॅटीन भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ Recipe…” to take” असा आहे. आज डाॅक्टरांच्या विशिष्ट पद्धतीने लिहीलेल्या अक्षराबाबत बरेच जोक्स आहेत. डाॅक्टर काय औषधे लिहून देतात ते नीट वाचता येत नाही वगैरे..जे काही  लिहीलेले आहे ते फक्त फार्मसिस्टलाच समजते असे कायम बोलले जाते.

पण डाॅक्टरांनी लिहून दिलेली औषधे ती माहिती घेऊन रूग्णांना देण्याचे काम हे फार्मसिस्ट करत असतात. बऱ्याच वेळा रूग्णांना दवाखान्यात अथवा डाॅक्टरकडे गेल्यावर तिथे असणाऱ्या गर्दीमुळे  औषधे कशी घ्यायची आहेत म्हणजे कोणते औषध कधी सकाळी दुपारी की जेवनाआधी की नंतर, झोपताना कोणती औषधे ह्या बाबात माहिती जर व्यवस्थीत समजली नसेल तर हे फार्मसिस्ट रूग्णांना अगदी व्यवस्थीत सोप्या पद्धतीने ती औषधे व ती कशी घ्यावयाची ह्या बद्दल माहिती देतात.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

एखादे औषध जर त्यांच्या कडे उपलब्ध नसेल तर ते रूग्णाला मदत म्हणून दुसर्‍या फार्मसिस्ट मित्राला फोन करून रूग्णांला ते औषध मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. वयस्कर लोकांना घरपोच सेवापण बरेच फार्मासिस्ट आज देत आहेत.

वैद्यकीय विषया इतकंच रूग्ण सेवा देणारं हे फार्मसिस्ट क्षेत्र आहे. रात्री बेरात्री चोवीस तास सेवा पुरवणारे हे क्षेत्र आहे.सध्याच्या कोरोना संसंर्ग काळात सुद्धा डाॅक्टरांच्या खांद्याला खांदा लावून हे फार्मसिस्ट आपली सेवा देत आहेत. कोरोना संसंर्ग महामारी काळात बर्‍याच फार्मासिस्ट असोसिएशन ने मोफत औषधे,  अल्पदरात औषधे, आपला स्वतःचा नफा कमी करून औषधांची विक्री केली. खरंच त्यांचे पण सामाजिक बांधिलकी व दृष्टीकोण ठेऊन  केलेल्या कामाचे कौतुक केले पाहिजे.आज ह्या जागतिक फार्मसिस्ट दिन साजरा करताना परत एकदा त्यांच्या कार्याला सलाम…

डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ, हर्डीकर हाॅस्पीटल, पुणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये