पुणे शहर

राज्यातील मागासवर्गीय गृहरचना संस्थांच्या बाबतीत सरकार “विशेष धोरण” ठरविणार : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

विधानभवनात मागासवर्गीय गृहरचना संस्थांच्या प्रलंबित विषयांबाबत विशेष बैठकीचे आयोजन

मुंबई : पुणे शहरातील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी तसेच अहिल्या, करूणा, पर्णकुटी सोसायटी यांच्यासह राज्यभरातील मागासवर्गीय गृहरचना संस्थांचे समाज कल्याण विभागाकडील प्रलंबित “निरंक” प्रमाणपत्र मिळणेबाबत तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे “विशेष बैठक” आयोजित केली होती.

Image editor output image 1227284195 17550948219225860873890685141901

या बैठकीला निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष निखिल गायकवाड, संचालक डॉ. पवन सोनवणे यांच्यासह समाज कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती दिपा मुधोळ- मुंडे तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव विलास कांबळे, डॉ. सुनिल धिवार, अहिल्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप ढिवाळ उपस्थित होते. समाज कल्याण विभागाकडील या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात एक महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी यावेळी दिले. या महत्वपूर्ण विषयावर सोसायट्यांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्वच मागासवर्गीय गृह रचना संस्थांचे प्रलंबित प्रश्न निकाली लावण्याबाबत राज्य शासनाकडून तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती यावेळी विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिली.

Img 20250811 wa0010773531396557201299
Img 20250508 wa00018046597267745442111
Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये