पुणे शहर

हा सन्मान पुणेकरांचा ; अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची भावना..

पुणे : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची  निवड करण्यात आली आहे.  या निवडीचे पत्र नुकतेच परिषदेकडून मोहोळ यांनी देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी निवडीचे पत्र दिले आहे. This honor belongs to Punekar;  Muralidhar Mohol’s feelings after being elected as the National Vice President of the All India Council of Mayors ..

याबाबत बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माझी निवड झाली असली, तरी पुणे शहराला हा बहुमान मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. राष्ट्रीय पातळीवर हे पद म्हणजे केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे.

या पदामुळे काम करण्याचा उत्साह तर आणखी वाढेलच, शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे. महापौरपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे दिल्यानंतर पदाला न्याय देण्याचा, झोकून आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही अशीच वाटचाल सुरु राहील.

पुणे शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे मोहोळ यांनी म्हंटले आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये