पुणे शहर

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी म्हातोबा मंदिरात काकड आरती सोहळ्यात सहभागी होत भक्तिरसात तल्लीन 

पुणे : पहाटेची वेळ…. टाळ मृदूंगाच्या गजरात…. शंखनादच्या घोषात लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर कोथरूड येथील म्हातोबा मंदिरात भाविकांच्या सोबत तल्लीन होतं कोथरूड मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी काकड आरतीत सहभागी होतं पांडुरंगाच्या भक्तीरसात स्वतःही आत्मतलीन झाले त्याचसोबत त्यांनी काही भजनाची पदेही म्हटली.

मोकाटे यांनी आज पहाटेपासूनच काकड आरतीच्या सोहळ्यात सहभागी होतं आनंद लुटला आज त्यांनी शास्त्री नगर व वारजे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कर्वे नगर येथील भैरवनाथ मित्र मंडळाचे मंदिर, भालेकर वस्ती, जय भवानी नगर, चांदणी चौकातील दिगंबर जैन स्थानक मंदिर आदी ठिकाणी मोकाटे काकड आरती सोहळ्यामध्ये सहभागी झाले काकड आरती नंतर त्यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या नागरिकांनीही त्यांना आशीर्वाद दिले.

Img 20241020 wa0001435697684176070576

यानंतर नागरिकांशी संवाद साधताना मोकाटे म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी महाराज संत एकनाथ महाराज आदी संतांनी महाराष्ट्राला समजप्रबोधणाची दिशा दिली त्याच्या विचारसरणीवरच आपल्या भक्तीचा पाया उभा आहे आपली दिवाळीची परंपरा हजारो वर्षांपासून चालली आहे ती यापुढेही ती चालूच राहील 

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0012281298193617916566931378
Img 20240404 wa0013281298602993728148316202

दीपावलीच्या मुहूर्तावर त्यांनी नागरिकांशी शुभेच्छाचा संदेश देत मतांचा जोगवा मागितला.नागरिक भाविकांनीही त्यांना आशीर्वाद देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये