मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात कोथरूडमध्ये एक सही संतापाची कार्यक्रमाचे महाविकास आघाडीतर्फे आयोजन

पुणे: मणिपूर मधील हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात “एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड गावठाण,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी, युवा सेना शहर प्रमुख राम थरकुडे,आणि NSUI कोथरूड अध्यक्ष राज जाधव यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.
या प्रसंगी प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे,आमदार रवींद्र धंगेकर,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, संगीता तिवारी, आमिर शेख,स्वप्नील दुधाने,योगेश मोकाटे,किशोर कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.













