पुणे शहर

अभूतपूर्व ड्रोन लाईट शोला हजारो पुणेकरांचा प्रतिसाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनोख्या शुभेच्छा 

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभूतपूर्व ड्रोन लाईट शोला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो पुणेकरांनी उपस्थित राहून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, मानबिंदू आणि विकसित भारताच्या स्वप्नाचं आकाशात उमटलेलं दर्शन उघड्या डोळ्यांनी अनुभवलं. आकाशात रंगीबेरंगी प्रकाशाच्या लहरींनी उभ्या राहिलेल्या आकृत्या पाहताना पुणेकरांच्या चेहऱ्यावर कौतुक, अभिमान आणि आनंद यांचा संगम दिसत होता.

केंद्रीय राज्य मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच झालेलं हे आयोजन पुणेकरांसाठी एक अनोखं पर्व ठरलं. “विकसित भारत” या संकल्पनेला साकार करणारे संदेश, सांस्कृतिक प्रतीकं, आणि मा. मोदींच्या जीवनप्रवासाचे पैलू ड्रोनच्या माध्यमातून इतक्या आकर्षक स्वरूपात उभे राहिले की, संपूर्ण वातावरणात देशभक्ती आणि उत्साहाची लहर निर्माण झाली.

Img 20250906 wa0042281292667080974856625006

हा शो फक्त एक दृश्यमान अनुभव नव्हता, तर तो प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडणारा भावनिक क्षण होता. पुण्याच्या आकाशात उमटलेला हा प्रकाशमहोत्सव भविष्यातील भारताची दिशा दाखवणारा आणि एकतेचा संदेश देणारा ठरला.

यावेळी राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक, प्रदीप कंद, दीपक मिसाळ, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह हजारों पुणेकरांची उपस्थिती होती.

Img 20250913 wa02065865367835442147326
Img 20250508 wa00014407724251968801054

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये