कर्वेनगरमध्ये शहिद मेजर प्रदिप ताथवडे यांची जयंती साजरी..

शहिद मेजर प्रदिप ताथवडे उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन..
कर्वेनगर : पाच अतिरेक्यांना मारून वीरगतीस प्राप्त झालेल्या शहीद मेजर प्रदिप ताथवडे Major Pradeep Tathawade यांची ६२ वी जयंती कर्वेनगर मधील शहिद मेजर प्रदिप ताथवडे उद्यानात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात ब्रिगेडीयर आनंद ठाकुर, लेखक सुभाष जाधव, कर्नल खाडीलकर, कर्नल शिंदे व कर्नल ढोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी शहीद मेजर ताथवडे यांच्या पुतळ्यास ब्रिगेडियर आनंद ठाकुर, सुभाष जाधव, गणेश पासलकर, गिरिष खत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ब्रिगेडियर ठाकुर यांनी शहीद मेजर प्रदिप ताथवडे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा जमलेल्या नागरिकांसमोर मांडली.



यावेळी कर्नल खाडीलकर यांनी सैनिकांच्या जिवनावर लिहलेल्या “जिंदगी का सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन वीर माता कुसुमताई ताथवडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वीर पत्नी लिनता प्रदिप ताथवडे गणेश पासलकर, गिरिष खत्री, प्राची बगाटे, रुपाली मगर, ताथवडे परिवार आणि बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रम संपन्न होण्यासाठी उज्वला बोडके, अनुराधा कर्णे, संध्य वैदय, प्रांजल ताथवडे, सुनीता वाघमोडे, माया चिकलीकर, शारदा घोरपडे, अंकुश राजे, प्रकाश लोहार, उमेश ढोकणे यांनी प्रयत्न केले.


