पुणे शहर

सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करा-विजय डाकले

राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये विविध पदांची घोषणा

पुणे : राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहराची आठ मतदार संघाचे अध्यक्ष आणि शहर कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक पक्ष कार्यालयामध्ये पार पडली .

Img 20201005 wa0008

आठही मतदार संघामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काम मोठ्या प्रमाणात काम करा, केंद्रात मोदी यांचे सरकार आल्या पासुन देशभर महिला आणि दलित यांचेवरील अन्याय , अत्याचार , बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे संपर्कातील जनतेला सांगा याकरीता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करा, आपल्या पक्षाची भुमिका, सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपुढे पोहचा. असे यावेळी सामाजिक न्यायचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांनी कार्यकर्त्यांना आपल्या मनोगतामधे सांगितले.

या बैठकीमध्ये संजु किसन भापकर अध्यक्ष पर्वती मतदार संघ नीलम विशाल शिंदे, महिलाअध्यक्ष कॅन्टोमेंट मतदार संघ   , सुदाम भिकाजी चांदणे सरचिटणीस पुणे शहर , बलभीम एकनाथ खंडागळे संघटक सचिव कसबा  मतदार संघ, संदीप शशिकांत काळे वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर , धनराज यादव कांबळे संघटक सचिव पर्वती मतदार संघ यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वैजनाथ वाघमारे,शंकर तेलंगे सचिन डाकले लहू कांबळे,संतोष बेंद्रे दयानंद जाधव विजय बगाडे अक्षय डावरे  उपस्थित होते.

‎डाकले म्हणाले, संघटना बळकट करण्यासाठी शहरातील प्रत्येक मतदारसंघात बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करावे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये