
पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त प्रभाग क्रमांक ९ मधील पुणे मनपा डॉक्टर व सर्व साफसफाई कामगार यांना सोलापुरी चादरी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजपा पुणे शहर सरचिटणीस राजेशजी पांडे,कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी,नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर,भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेशजी पिंगळे, माजी महापौर दत्ता गायकवाड,दिलीप मुरकुटे,बबनराव चाकणकर,लक्ष्मणराव सायकर, मोहन आवटी,प्रकाश बालवडकर,राहुल कोकाटे,सचिन पाषाणकर,उत्तम जाधव,प्रवीण आमले,प्रवीण शिंदे, रोहन कोकाटे,निलेश सायकर,लखन कळमकर,सुधीर ताम्हाणे,सागर ताम्हाणे,राहुल पारखे,नितीन सायकर, संदीप वाडकर यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोविड योध्याचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉ.गणेश ढमाले,डॉ मीनल पाचूनडे, डॉ धनंजय शिरोडे,एस आय चांदगुडे साहेब,एस आय लोखंडे साहेब,एस आय सांगडे मॅडम,एस आय निकम यांना सन्मानित करण्यात आले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील ३५० साफसफाई कर्मचारी यांना चादरी देण्यात आल्या



