पुणे शहर

वारजे -कर्वेनगर भागातील कर्तृत्ववान नवदुर्गांचा माणिक दुधाने परिवाराच्या वतीने सन्मान…

कर्वेनगर : pune city, karvenagar स्त्रीचे समाजातील महत्वपूर्ण स्थान लक्षात घेऊन, वारजे -कर्वेनगर भागातील आपापल्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा, मुलींचा माणिक दुधाने परिवाराच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन सन्मान करण्यात आला. Manik Dudhane family honors  Navdurgas in Warje-Karvenagar area …

माता-भगिनींनी प्रति अपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह.भ.प. माणिक दुधाने, पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रविण दुधाने, तेजल दुधाने यांच्यावतीने कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारजे कर्वेनगर भागातील डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील, शिक्षिका, नर्स, खेळाडू, कलाकार, लेखिका, पोलिस, पत्रकार, उदयोजक, स्वच्छता कर्मचारी अशा सुमारे ५०० नवदुर्गांचा फेटे बांधून, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅड. निलीमा वर्तक, माजी उपमहापौर, नगरसेवक दिपक मानकर, अभिनेत्री मानसी पिळणकर- भोईटे, बाळासाहेब बराटे,  विठ्ठल शेवाळे, कुमार बराटे, बाबा धुमाळ, दीपक बागुल, अशोक सोमवंशी, गोरख भालेकर, अनिल मानकर, नवनाथ कानगुडे, प्रमोद पारखी, निलेश म्हस्कुले, वैभव पुंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते  नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

यावेळेस तेजल दुधाने यांनी आजपर्यंत केलेल्या समाजिक कामांचा आढावा उपस्थितांना दिला, आणि यापुढे ही सातत्याने अशाच पद्धतीने काम करत राहू असे आश्‍वासनही दिले. अॅड.निलीमा वर्तक व दिपक मानकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले.

Img 20211022 wa0034

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये