तिहार जेलमध्ये मंत्र्याचा थाटमाट ; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

दिल्ली : तिहार जेलमध्ये असणारे कॅबिनेट मंत्री यांचा मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या कॅबिनेट मंत्र्याला 30 मे रोजी अटक केली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये जेल मध्ये मंत्र्याची मस्तपैकी एक व्यक्ती मसाज करत असल्याचे दिसत असून आणखीही काही लोक दिसत आहे.
देख रहा है बिनोद
— Vishvas Kailash Sarang (@VishvasSarang) November 19, 2022
कट्टर ईमानदार पार्टी ने तिहाड़ जेल में ही अपने भ्रष्ट मंत्री सत्येंद्र जैन के लिए मसाज पार्लर खोल रखा है
ये वही भ्रष्ट सत्येन्द्र जैन है जिसे @ArvindKejriwal पद्म श्री देने की वकालत कर रहे थे,ये वही भ्रष्ट सत्येन्द्र जैन है जिस पर पैसे ले कर टिकट देने का आरोप है pic.twitter.com/szWmumCEWN
आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे भाजपने टीकेची झोड उठवली आहे. जेल मध्ये मंत्र्याला अशा सुविधा पुरवल्या जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आप सरकार कडून जेलच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.







