कोथरुड

MNGL बाबत नागरिकांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी दिलीप वेडेपाटील यांच्याकडून बैठकीचे आयोजन

कोथरुड : kothrud news  प्रभाग क्रमांक १० बावधन-कोथरूड मधील  अनेक सोसायटी सभासदांना  MNGL च्या कनेक्शन व  सेवेबाबत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आज नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने MNGL अधिकाऱ्यांबरोबर घेण्यात आलेल्या बैठकीत सोसायट्यांमधील नागरिकांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रभागातील सोसायटीमध्ये MNGL बाबत निर्माण होत असलेल्या समस्यांवर चर्चा करून कायमस्वरूपी मार्ग काढता यावा यासाठी MNGL च्या अधिकारी वर्गासोबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या सोसायटीमध्ये उद्भवणार्‍या समस्या अधिकार्‍यांसमोर मांडल्या. MNGL कनेक्शन मिळण्याबाबत होत असणाऱ्या विलंबा बाबत, असणारी मुख्य तक्रार यावेळी नागरिकांनी उपस्थित केली. 

यावेळी प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात याबाबतचे निवेदन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी MNGL चे मुख्य अभियंता राहुल धानोरकर यांना दिले. 

IMG 20210116 WA0007

या बैठकीला प्रभाग क्र. १० मधील विविध सोसायटींचे सभासद, पदाधिकारी व  MNGL चे मुख्य अभियंता राहुल धानोरकर, पुणे मनपा पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश शिर्के, सतीश शिंदे, अतुल पाटील, उदय दाणी, पराग सपकाळ, अमिता नीलाखे, सचिन पंडित, देवीदास भाग्यवंत, विशाल कानहेरकर, प्रा. भगवान पांडेकर आदी उपस्थित होते.

IMG 20210128 WA0172
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close