कोथरुड

प्रभाग १० बावधन भुसारीमध्ये सामाजिक जाणीव असलेले नेतृत्व घडणार..  एम.एस.डब्ल्यू. शिक्षित महिला उमेदवार रूपाली पवार यांना सुज्ञ मतदार वर्गातून सकारात्मक प्रतिसाद

कोथरूड : मास्टर इन सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे समाजातील मूलभूत प्रश्न, दुर्बल घटकांच्या समस्या आणि प्रशासनाची कार्यपद्धती यांची सखोल जाणीव असल्याने आपण नागरिकांचे प्रश्न उत्तम पद्धतीने सोडवू  शकतो असा विश्वास प्रभाग क्रमांक 10 भुसारी कॉलनी, बावधन मधील भाजपच्या उमेदवार रूपाली सचिन पवार यांनी व्यक्त केल्या.

पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना या प्रभागातील भाजप उमेदवार रूपाली पवार, अल्पना वरपे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील यांनी प्रचार यात्रा, रॅली, वैयक्तिक गाठीभेटी या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला आहे. त्यांच्या या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रूपाली पवार म्हणाल्या, विकासकामे महत्त्वाची असली तरी केवळ रस्ते, पाणी आणि ड्रेनेजपुरते न थांबता सामाजिक प्रश्न सोडवण्यावर ही आपला ठाम भर राहील, तसेच लोकोपयोगी प्रकल्प ही प्रभागात उभारण्याचे स्वप्न आहे.

महिलांचे प्रश्न, युवकांचे व्यसनाधीनतेकडे झुकणे, बेरोजगारी, स्वच्छता, आरोग्य, महिला सुरक्षा आणि सामाजिक समतोल यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे. शिक्षणाच्या काळात मिळालेल्या सामाजिक कार्याच्या अनुभवामुळे समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची क्षमता आपल्यात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“लोकप्रतिनिधींनी विकास कामे करत असताना समाजाचा संवेदनशील प्रतिनिधी ही बनले पाहिजे,” असे सांगत रूपाली पवार यांनी विकास आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीकडे सुज्ञ मतदार वर्गातून सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

या प्रभागातील भाजपचे उमेदवार असणारे अल्पना वरपे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील यांनी मागील कार्यकाळात प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे ही मार्गी लावलेली आहेत. अनेक प्रकल्प त्यांनी प्रभागात केलेले आहेत त्यामुळे आम्हा चारही जणांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून आमचा विजय नक्की आहे असा विश्वास रूपाली पवार यांनी व्यक्त केला आहे.

Img 20251125 wa01782121520512185783132

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये