पुणे शहर
भाजप युवा मोर्चाच्या वतीने चांदणी चौकात आंदोलन

पुणे : काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज चांदणी चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा यावेळी तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनास प्रदेश चिटणीस युवा मोर्चा गणेश वरपे, प्रभाग क्र. १० चे अध्यक्ष श्री. सागर कडू, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, प्रदेशाध्यक्ष स्वच्छता भारत अभियान धनंजय दगडे पाटील, मुळशी तालुका भाजपाचे उपाध्यक्ष सुनील दगडे पाटील, राजेश मनगिरे, प्रदीप जोरी उपस्थित होते.







