महाराष्ट्र

खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.

Fb img 1647413711531 1

मागील काही दिवसांपासून गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होता. गोरेगाव येथे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणि दसऱ्याला बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यातच गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

Img 20221110 wa00073901519538805506528

अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकधिकार समिती महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या समितीचे गजानन किर्तीकर अध्यक्ष आहेत. पण, या कार्यक्रमाला किर्तीकर हेच अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये