प्रभागातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट- हर्षवर्धन दीपक मानकर

सुतारदरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदयात्रेत नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर अंतर्गत सुतारदरा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर (गट अ), तृप्ती निलेश शिंदे (गट ब) व कांता नवनाथ खिलारे (गट क) यांची पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी- शिवतीर्थ नगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर म्हणाले “प्रभागातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सहकार्याने आणि विश्वासावर विकासाची नवी दिशा देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन,” असे मत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांनी यावेळी व्यक्त केले.

या पदयात्रेद्वारे उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्या, नागरी अडचणी व विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक सुविधा तसेच परिसरातील मूलभूत विकासकामांबाबत आपली मते मांडली. यावेळी उमेदवारांनी नागरिकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले व प्रत्येक समस्येवर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, महिला सुरक्षितता व नागरी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या समस्या मांडल्या. प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी – शिवतीर्थ नगर च्या सर्वांगीण, शाश्वत आणि पारदर्शक विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धारही यावेळी पॅनल उमेदवारांनी व्यक्त केला.
“प्रभागातील महिलांचा, ज्येष्ठांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. नागरिकांच्या विश्वासावर प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू,” असे मत महिला उमेदवार तृप्ती निलेश शिंदे व कांता नवनाथ खिलारे यांनी यावेळी व्यक्त केले.
या पदयात्रेला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. पदयात्रेमुळे प्रभागातील जनसंपर्क अधिक दृढ झाला असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



