पुणे शहर

कोथरूड मधील हनुमाननगर मध्ये आगीची घटना..आगीत रेशनिंगाच्या दुकानातील सामानाचे नुकसान

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची घटनास्थळी भेट..रेशनिंग अधिकाऱ्यांकडे केली महत्वाची मागणी..

कोथरूड :  कोथरूड मधील हनुमाननगर येथे आज आगीची घटना घडली. या आगीत या भागातील रेशनिंगचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळेत येऊन या आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या आगीत रेशनिंग दुकानातील मोठ्या प्रमाणावर धान्य व इतर साहित्य जळून नुकसान झाले असल्याने मानकर यांनी यासंदर्भात संबंधित रेशनिंग अधिकारी प्राजक्ता माळी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

Img 20260222 wa00063555196620042442486

या आगीत रेशनिंग दुकानातील नुकसान झालेल्या धान्याचा पंचनामा करून नागरिकांना तातडीने पर्यायी व्यवस्था करून रेशन धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी मानकर यांनी रेशनिंग अधिकारी प्राजक्ता माळी यांच्याकडे केली आहे.

Fb img 17732467395761536921276808087022

घटनास्थळी उपस्थित रेशनिंग धान्य दुकान मालक व नागरिकांशी संवाद साधून मानकर यांनी अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. या घटनेमुळे परिसरातील लाभार्थी नागरिकांना रेशन धान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.

Fb img 17722786558115856474783028037709

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये