कोथरुडपुणे शहर

हनुमाननगर ते समता मित्र मंडळ रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज नामकरण सोहळा संपन्न

नगरसेविका छाया अजय मारणे यांच्या प्रयत्नामुळे नाव समितीत विषय मंजूर

पुणे : प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी- केळेवाडी हनुमाननगर मधील अंतर्गत रस्ता जयहिंद मित्र मंडळ ARAI रोड हनुमाननगर ते समता मित्र मंडळ मोरे श्रमिक वसाहत या रस्त्याला २० वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज पथ असे नामकरण केले होते. आज रोजी पुणे महानगरपालिका नाव समिती मध्ये नगरसेविका छाया मारणे यांच्या प्रयत्नामुळे अधिकृतरित्या ठराव करून या रस्त्याला नाव देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज पथ रस्त्याचे नामकरण आणि CCTV लोकार्पण सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष आणिआमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोथरूड भाजप अध्यक्ष पुनीत जोशी, स्वरद फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ,समिर पाटील, अजय मारणे, अनिता तलाठी, संदीप खर्डेकर, संदीप मोरे सुरेखा जगताप, संतोष घारे,आशुतोष वैश्यपायन,मधुरा वैश्यपायन, पल्लवी गाडगीळ, केतकी कुलकर्णी, वैभव मुरकुटे, वृषभ मोकाटे, अतुल शिंदे तसेच प्रभागातील सार्वजनिक मंडळे आणि त्याचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये