मोरे श्रमिक वसाहत मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा नागरिकांशी थेट संवाद

प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर (गट अ), तृप्ती निलेश शिंदे (गट ब) व कांता नवनाथ खिलारे (गट क) यांच्या उपस्थितीत समता मित्र मंडळ, मोरे श्रमिक वसाहत येथे कोपरा सभा उत्साहात पार पडली.
या वेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विविध समस्या मांडण्यात आल्या. सर्व उमेदवारांनी नागरिकांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेतले व त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, पारदर्शक कारभार करणे आणि सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
या कोपरा सभेमुळे प्रभागातील नागरिकांशी नाते अधिक दृढ झाले असून नागरिकांकडून संपूर्ण पॅनेलला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सदर कोपरा सभेस महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



