पुणे शहर

प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे व विकासकामांना गती देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट- हर्षवर्धन दीपक  मानकर

सुतारदरा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा जनसंवादातून प्रचार

पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर अंतर्गत सुतारदरा भागात आज सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण पॅनेलचे उमेदवार हर्षवर्धन दीपक  मानकर (गट अ), तृप्ती निलेश शिंदे (गट ब) व कांता नवनाथ खिलारे (गट क) यांची पदयात्रा उत्साहात पार पडली. 

या पदयात्रेदरम्यान परिसरातील विविध भागांतून फिरत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. उमेदवारांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Img 20251125 wa01782121520512185783132

यावेळी उमेदवार हर्षवर्धन दीपक  मानकर म्हणाले, “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे व विकासकामांना गती देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. पदयात्रेमुळे प्रभागातील जनसंपर्क अधिक मजबूत झाला असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये