बिलांसर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करा ; अन्यथा आंदोलन करू : महेश वाबळे

सहकारनगर : वीज बिलांचा गोंधळ, बिलातील चुका आणि वाढीव बिलांसदर्भात पद्मावती विज वितरण कार्यालयाबाहेर नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या सुरू असलेल्या कारभाराचा नागरिकांनी घोषणा देऊन निषेध केला.
यावेळी नगरसेवक महेश वाबळे यांनी नागरिकांना समवेत अधिकाऱ्यांची भेट घेत ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण तातडीने करावे, वेळेत व अचूक रिडींग घेऊन बिले द्यावीत, बिलांवर चक्रवाढ व्याज लावू नये, नागरिक योग्य बिल भरण्यास तयार आहेत. परंतु त्यांना बिलाची रक्कम पुढील तीन महिन्यात हप्त्यात भरण्याची सवलत द्यावी. अशी मागणी केली. या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
पद्मावती महावितरण कार्यालयातील विज बिलांचा गोंधळ कायम असून वाढीव बिल आणि बिलातील चुका दुरुस्तीसाठी करण्यासाठी महावितरणाकडे ग्राहकांच्या चकरा वाढल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात एकत्रित बिले पाठवून अगोदरच शॉक दिलेल्या महावितरण कार्यालयाने पुन्हा एकदा वाढीव बिले पाठविल्याने बिल कमी करण्यासाठी पद्मावती वीज वितरण कार्यालयात नागरिकांनी आंदोलन केले.
कोरोनाच्या संकटामुळे कात्रीत सापडलेल्या नागरिकांनी करावे तरी काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. झोपडपट्ट्या पातळीवर राहणारे नागरिक हे मोलमजुरी, धुणीभांडी करून आपले पोट भरतात.
करोनाच्या संकटामुळे हाताला काम नाही. घरगाडा कसा चालवा वा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि त्यात भर म्हणून महावितरण कडून आलेली मोठमोठी रक्कमेची बिले त्यांच्या संकटात भर पाडत आहेत.
परिसरातील चव्हाणनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत, राजीव गांधीनगर, तळजाई वसाहत, पांचाळ वस्ती, आंबेडकर वस्ती, गवळीवाडा, जय मल्हार वस्ती, टांगेवाली कॉलनी, शाहू वसाहत, दाते बसथांबा, शिवदर्शन, मोगल वसाहत, मोरे वस्ती. हा भाग येतो. येथील नागरिकांनी वाढीव विजबिलामुळे त्रस्त झाले आहेत.



