कर्वेनगरमध्ये चिनी मांजाने गळा कापला गेल्याने एक जण जखमी..

कर्वेनगर : कर्वेनगर गल्ली नंबर ५ येथून दुचाकीवरून जात असताना प्रणव विनायक जाना या मुलाचा चिनी मांजामुळे गळा कापला गेला असल्याची घटना घडली असून या घटनेत प्रणव जखमी झाला आहे.
प्रणव याला उपचारासाठी तातडीने दिवीज साळुंखे यांनी कर्वेनगर मधील खेनट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पतंगाच्या चिनी मांजामुळे या अगोदरही अनेक जणांना आपला जीव गमावावा लागला असल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. मागील आठवड्यात सिंहासन news ने याबाबत बातमी प्रसिद्ध करून नागरिकांना चिनी मांजा पासून सावध राहण्याचा इशारा दिला होता.
चिनी मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही तो मुलांना पतंग उडवण्यास मिळतो म्हणजे तो ठराविक ठिकाणी विक्रीस आहे हे नक्की. हा मांजा रस्त्यावर आडवा आल्याने शहरात काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे. हा मांजा पोलीस प्रशासनाने शोधून विक्रेत्यांवर कारवाई करणे फार गरजेचे आहे.
मागील आठवड्यात शहरात मांजा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र शहरातील उपनगरांमध्ये ही चिनी मांजाची विक्री चालू असून त्याबाबतही प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन जागे झाले तर त्याचा उपयोग होणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सिंहासन News नागरिकांनो सावधान : कोथरुडमध्ये चिनी मांजा करू शकतो घात.. https://www.sinhasannews.com/citizens-beware-chinese-manja-can-kill-in-kothrud-8187/



