कर्वेनगर स्मशानभूमीतील विद्युत दाहीनीला विरोध ; महापौर व आयुक्तांना निवेदन..

कर्वेनगर : कर्वेनगर येथील स्मशानभूमीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. परंतु विद्युत दहिनी बसविण्यात आलेली जागा पूररेषेत असून विद्युत दाहिनीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरून रहिवाशी भागातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विद्युत दाहिनी बंद करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
या संदर्भात कर्वेनगर मधील नागरिकांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे. यावर आयुक्तांनी पाहणी करून निर्णय घेऊ असं आश्वासन निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी कांता अप्पा बराटे, नगरसेवक सुशील मंगडे, बाळासाहेब ख. बराटे, विनोद मोहिते, अशोक पानेकर, हिंदुराव पाटील, माणिक दुधाने, बंडू तांबे, संजय बराटे, विजय खळदकर, गणेश पासलकर, सुनील तोडकर आदी उपस्थीत होते.
कर्वेनगर स्मशान भूमीतील विद्युत दाहिनित जवळपास उत्तमनगर, शिवणे वारजे या भागातील प्रेत अंत्यविधी साठी आणली जातील, त्यामुळे ताण निर्माण होणार आहे. या स्मशान भूमीला रहिवाशी भाग मोठा आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून विद्युत दाहिनी बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.




