पुणे शहर

अंतर शालेय कबड्डी निवड स्पर्धांचे आयोजन

पुणे : माजी नगरसेवक स्व.दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मरणार्थ महाराणा प्रताप संघ , पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग, क्रिडा युवक संचलनालयाच्या वतीने अंतर शालेय कबड्डी निवड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतर शालेय १४,१७ व १९ वयोगटात ही मुले, मुली कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची सुरवात तहसीलदार राधीका बारटक्के, अर्जुन पुरस्कार प्राप्त शांताराम जाधव, शिव छञपती पुरस्कार प्राप्त संगीता सोनवणे, जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे, कोषाध्यक्ष अजय पाटील, तानाजी शिंदे, महेश तिकोणेसर यांच्या हस्ते क्रिडांगणावर श्रीफळ वाढवून करण्यात आली.

या स्पर्धेत १४ वर्षे गटातील मुलींच्या १०० संघानी सहभाग नोंदवला. सदर प्रसंगी संयोजक राजाभाऊ पासलकर , राजेंद्र आंदेकर सेक्रेटरी पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन, संजय पासलकर उपस्थित होते.

Img 20221126 wa0212847205965836399706

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये