कोथरूडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दिवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थी कार्यशाळेचे आयोजन !

पुणे : दीपावलीनिमित्त दिवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक फाउंडेशन तर्फे आपल्या प्रभागातील महानगरपालिकेच्या मामासाहेब मोहोळ शाळा येथे विद्यार्थी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर,मुख्याध्यापिका संगिता बारवे, मनिषा पाटील, सुमेधा खडतरे, सुनिता खरात, , स्नेहल कुलकर्णी, चेतन पानसरे. मयुर घोडके, दिलीप कानडे, आशिष शिंदे आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जशी वाट मोकळी करून दिली जाते त्या वाटेने त्यांची बुद्धी चालायला लागते. या छोट्या छोट्या कार्यशाळांमधूनच चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी साकारलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम अशा कलाकृती बघून मनस्वी समाधान आणि आनंद मिळाला. या कार्यशाळेस प्रभागातील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.







