कोथरुड

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून ५ हजार महिलांना संक्रांतीची भेट..

कोथरुड :  प्रभाग क्र. १० कोथरूड – बावधन मधील
५ हजार महिला-भगिनींना मकरसंक्रांतनिमित्त नगरसेवक किरण दगडे पाटील, सरपंच पियुषा किरण दगडे पाटील, व युवानेते युवराज मोकाटे यांच्या वतीने भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी किरण दगडे पाटील यांच्या सामाजिक व विकास कामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. Sankranti gift to 5000 women from corporator Kiran Dagde Patil ..

यावेळी  प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विक्रांत पाटील, आमदार भिमराव तापकीर , सिनेदिग्दर्शक, अभिनेते  प्रविण तरडे,  नगरसेवक  सुशिल मेंगडे, संदीप खर्डेकर,  पुनीत जोशी, श्री. सचिनजी मोरे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे – पाठक, वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, सहकार्यालयीन मंत्री राजेश कुलकर्णी, दिपक दुधाने, सागर कडू,  धंनजय दगडे पाटील, गणेश कोकाटे, अभिजित गाडे, रुपेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी मकरसंक्रांतनिमित्त प्रभागातील महिलांना इन्सुलिटेड टिफिन बॉक्स( गरम जेवणाचा डब्बा) व हॉटपॉट( चपाती ठेवण्याचा डब्बा) यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. किरण दगडे पाटील कायमच प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. याच बरोबर त्यांचे सामाजिक उपक्रम ही सातत्याने चालू असतात. विकास कामे करणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे, पण ही कामे करत असताना समाजासाठी सामाजिक उपक्रम चालू ठेवणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. आणि याच तत्वानुसार किरण दगडे पाटील यांचे काम सुरू आहे.   

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये