समाजाच्या संरक्षणासाठी कायम तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रूट बॉक्स चे वाटप ; पृथ्वीराज सुतार यांचा उपक्रम

कोथरुड : pune city रात्रं-दिवस काम करून समाजाला सुरक्षित ठेवणाऱ्या व कोव्हिड-१९ च्या आपत्कालीन संकटामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व स्तरातील नागरिकांना आधार देण्याचे काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी कोवीड योद्धांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना दीपावलीच्या निमित्ताने ड्रायफ्रूट बॉक्स चे वाटप पोलीस करण्यात आले. शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हे वाटप कोथरूड पोलीस स्टेशन, अलंकार पोलीस स्टेशन, विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय व कोथरूड वाहतुक विभाग, पुणे शहरचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना करण्यात आले.

या प्रसंगी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) बाळासाहेब बडे , अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, कोथरूड वाहतुक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे, विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय पोलीस उपनिरीक्षक आर.एस.किरवे हे उपस्थित होते.



हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवराज सुतार, धर्मराज सुतार, सुधीर वरघडे, हेमंत मोहोळ, सुमित माथवड, संजय डाळिंबकर,शशी नाकते, शरद डहाळे, नचिकेत घुमटकर, सुरज अवधूत, सुंदर खुडे यांनी सहकार्य केले.

















































































