महाराष्ट्र

शालेय व संघटना पुरस्कृत कुस्ती स्पर्धेत  कुस्तीपट्टूंचा कमी वयाच्या खोट्या प्रमाणपत्राद्वारे सहभाग; कुस्ती मल्लविद्या संघाकडून सरकारकडे तक्रार

पुणे : शालेय विभागामार्फत तसेच महाराष्ट्रातील संघटनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या किंवा निरिक्षणाखाली पार पडणाऱ्या शालेय कुस्ती क्रीड़ा व संघटना माध्यमातून घेण्यात येणाऱ्या वय वर्ष 14/15/17 लहान वयोगटा मर्यादित कुस्ती स्पर्धांमधे काही विधार्थी खोटे वय दाखवून स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. अशी तक्रार कुस्ती मल्लविद्या संघाकडून प्रवक्ते निकुंज उभे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

उभे म्हणाले, महाराष्ट्रात पुण्यासारख्या अनेक जिल्हामध्ये राज्यस्तरीय ,जिल्हास्तरीय ,तालुकास्तरीय वय वर्ष 14/15/17 वयोगटातील विद्यार्थी कुस्तीगीरासाठी अनेक कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत असते. यामध्ये निदर्शनास येते आहे की काही विद्यार्थ्यांनी त्यांचे खरे वय लपवून कमी वय दाखवणारे बनावट किंवा चुकीचे प्रमाणपत्र वापरून स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. व खेळत आहेत.

Img 20250711 wa01938153452573979352517

अशा काही विद्यार्थ्यांच्यावर कुस्ती स्पर्धेमध्ये आक्षेप घेतला असता त्यांच्याकड़े खोट्या वयाचे मूळ जन्मदाखले ,आधारकार्ड ,शाळेचे दाखले इतर कागदपत्र प्रमाणपत्र हे दाखवण्यात येतात व ते सहज यातून सुटका करतात असे समजत आहे की काही विद्यार्थी पुढील वर्गातून शाळा बदलून दुसऱ्या शाळेमध्ये पुन्हा मागच्या वर्गात चुकीच्या पद्धतीने प्रवेश घेतात त्याच्या अश्या गैरकृत्याना त्यांच्या पालक,प्रशिक्षका बरोबर काही शाळा तर सहभागी नाहीत ना?असे प्रश्न पड़त आहेत.हे प्रकार केवळ स्पर्धेच्या नैतिकतेच्या बाधा आणतातच परंतु खऱ्या पात्र आणि योग्य वयाच्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करतात.

Img 20250704 wa00173607138186167183613

कृपया शालेय व संघटनांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या अशा कुस्ती स्पर्धामधे आपण कटाक्षाने लक्ष्य केंद्रित करुन अशा संशयित व स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांच्या पालकाकडून तक्रार करण्यात येणाऱ्या बनावट वय कागदपत्रे बनवणाऱ्या डमी खेळाडूंची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भविष्यात याबाबत कड़क स्वरुपाची नियमावली आपल्यामार्फत करावी.
शासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी.ही अपेक्षा आणि कुस्ती क्रीड़ा शौकीनानकडून कळकळीची विनंती कुस्ती मल्लविद्या पुणे प्रवक्ता पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी केली आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये