खडकवासला मतदारसंघात भाजप महायुती उमेदवार भीमराव तापकीर यांना उत्तर भारतीयांचा जाहीर पाठिंबा.

अभिनेते रवी किशन यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारासाठी उत्तमनगर, शिवणे, आणि धनकवडी परिसरात आयोजित केलेल्या भव्य प्रचार रॅलीने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार रॅलीत उत्तर भारतीय समाजाने भीमराव तापकीर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
भीमराव तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील उत्तमनगर, शिवणे, आणि धनकवडी परिसरातील नागरिकांसोबत थेट गाठीभेटी घेत, त्याचबरोबर विकासकामांचा आढावा सादर करत थेट संवाद साधला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या समाजाने भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. या रॅलीदरम्यान महायुती सरकारच्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत, ‘कमळ’ चिन्हासोबत असलेला प्रगतीचा आश्वासक संदेश मांडण्यात आला.

श्री सद्गुरु शंकर महाराज पालखी सोहळा:
धनकवडी बालाजी नगर येथे आयोजित श्री सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिन पालखी सोहळ्यात खासदार रवी किशन आणि भीमराव अण्णा तापकीर यांनी सहभाग घेतला. त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजप-महायुतीच्या वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीतील जनसमुदायाचा उत्साह पाहून खडकवासला मतदारसंघ पुन्हा महायुतीच्या विजयाची नोंद करणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.



भीमराव अण्णा तापकीर यांचे आवाहन:
” मतदारसंघातील सर्व नागरिकांनी महायुती सरकारच्या ‘विकासाच्या प्रवाहात’ सहभागी होण्यासाठी, ‘कमळ’ चिन्हाला मतदान करावे आणि पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करण्यासाठी माझ्या हातात बळ द्यावे,” असे आवाहन भीमराव तापकीर यांनी यावेळी केले.
“कमळासाठी मतदान करा, विकासासाठी साथ द्या!”
रवी किशन यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे प्रचारात रॅलीत नवचैतन्य निर्माण झाले, खडकवासला मतदारसंघात भाजप महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.






