पुणे शहर

चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात कोथरूडमध्ये चांगली विकासकामे केली- शहरप्रमुख गजानन थरकुडे

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला. त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला. असे मत पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शनिवारी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती एकता कॉलनी, आदी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संपर्क साधला या परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

Img 20241020 wa0001435697684176070576

थरकुडे म्हणाले की, मोकाटे सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर विकासकामे केली ते या भागातील रहिवासी आह त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱया समस्याची माजी आमदार मोकाटे यांना जाणीव होती.

थरकुडे पुढे म्हणाले की मोकाटे कर्वेनगर वारजे कोथरूड परिसरात होणारी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी कॅनलवर रस्ते बांधले चांदणी चौकातील होणाऱ्या अपघात विषयी आंदोलन केली आणि आवाज उठवला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोकाटेच पुन्हा आमदार व्हावेत म्हणून जोमाने काम करीत आहेत त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे

आज झालेल्या पदयात्रेत शिवाजी गाढवे, माजी नगरसेविका वैशाली मराठे, चंदू कदम, राजू मराठे, संजय मोकाटे, दत्तोबा वांबीरे, बाळासाहेब खैरे,राजेश पासलकर, राजू मगर आदी सहभागी झाले होते

Img 20240404 wa0015281292591121734012341242
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये