पुणे शहर

पुण्याचा पाणीपुरवठा राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे गुरुवारी सुरळीत राहणार

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा शुक्रवारी निश्चित झाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अंतर्गत दुरुस्तीसाठी जाहीर करण्यात आलेला गुरुवारी पाणी बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.  

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. २७ मे रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते तीन कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दत्तमंदिराचा १२५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘लक्ष्मीदत्त’ कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये