पुणे शहर

पुणे शहरातील पुणे महापालिकाचे पहिले वहिले धनुर्विद्या संकुल,आता आपल्या कर्वेनगरमध्ये…

१६ ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन..

कोथरूड : कर्वेनगर प्रभागात सुरू होत असलेला पुणे महापालिकेच्या पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलचा भूमिपूजन  सोहळा येत्या 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

कर्वेनगरमधील धनुर्विद्या संकुल  म्हणजे केवळ एक इमारत किंवा मैदान नव्हे, तर अनेक नवोदित खेळाडूंचे स्वप्न साकार होण्याची आशा आहे. स्थानिक माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्निल दुधाने यांचा अथक प्रयत्न आणि प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात  साकार होत आहे. 

Img 20250508 wa00011184667503723765598

या धनुर्विद्या संकुलचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ९:३० वाजता, १०० फुटी डीपी रोड, सर्वे नंबर ९, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे खासदार सुप्रिया  सुळे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती स्वप्नील दुधाने यांनी दिली.

Img 20251008 wa00636567720300341058591
Img 20251004 wa0000148917864967549286

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये