महाराष्ट्र

१ जानेवारीला पुणे नगर रस्ता राहणार बंद

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

पुणे : कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. एक जानेवारीला नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव bhima koregaon येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एक जानेवारी रोजी पुणे नगर महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे,असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटन मध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरावात केली आहे.

दरवर्षी एक जानेवारीला शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात. या दिवशी भीमा कोरेगाव परिसर गर्दीने भरून गेलेला असतो. परंतु या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Img 20201213 wa0074

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये