पुणे शहर

राजेश पळसकर यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदी नियुक्ती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार – राजेश पळसकर

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून पुणे शहराच्या उपशहरप्रमुख पदी राजेश पळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

राजेश पळसकर यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करताना त्यांच्याकडे कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेश पळसकर यांनी यापूर्वी युवा सेना आणि शिवसेना कोथरूड विभाग प्रमूख म्हणून काम केले आहे. आत्ता युवा सेना राज्य विस्तारक म्हणून पळसकर कार्यरत होते. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना हि नवी जवाबदारी देण्यात आली आहे.

राजेश पळसकर म्हणाले,  मी अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहे. कोथरूड भागात शिवसेनेची मोठी ताकद आहे. नव्या आणि जुन्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

Img 20240202 wa00032332203558256672939

पद, नाव व कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे

जिल्हाप्रमुख : अशोक खांडेभराड (विधानसभा – शिरूर,

खेड, आळंदी), समन्वयक : योगेश बाबर (पिंपरी-चिंचवड),

उत्तम गोगावले (खेड- आळंदी नगरपालिका), बाळासाहेब

दांगट (जुन्नर, आंबेगाव). उपशहरप्रमुख : राजेश पळसकर

कोथरूड, खडकवासला). जिल्हा संघटक : नंदू भारणे

(चिंचवड). जिल्हा निवडणूक समन्वयक : विजय देशमुख

(हडपसर, भोसरी). शहरप्रमुख (अतिरिक्त ) : संजय

मोरे (हडपसर). उपविभागप्रमुख : तारिक शेख (वडगाव

शेरी), आदिनाथ भाकरे (हडपसर).

Img 20240202 wa00042210657172365864812
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये