पुणे शहर

पुण्यात रात्री एक वाजता मुठा नदी पात्रात पाण्यात अडकलेल्या पाच जणांची सुटका

पुणे : रात्रीच्या वेळी अंधारात पुण्यात मुठा नदीच्या पात्रात अडकलेल्या चारचाकी गाडी तील पाच जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात उतरून वेळीच सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणी ही जखमी झाले नाही.

एरंडवणे अग्नीशमन दलाला दि. १२/०८/२०२२ रोजी रात्री १ वा ४६ मिनीटांनी एस एम जोशी पुला खालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची वर्दी मिळाली. एरऺडवणा केऺद्राची मदत पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेट च्या साह्याने नदी पात्रात उतरून टाटा टिगोरो (MH 48 6151)      या गाडी जवळ जाऊन गाडी मध्ये भेदरलेल्या अवस्थेत अडकलेल्या पाच व्यक्तीऺना सुखरूप बाहेर काढले.

Fb img 1647413711531

अधिक माहिती घेतली असता सदर गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून पुण्यात नातेवाईकांकडे आले होते, आणि रजपूत विटभट्टी कडून कारमध्ये  पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याऺची  गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली  अडकली होती,  दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचले आणि त्यांना मदत केली.

Img 20220801 wa0304

या घटनेमध्ये १.वऺचिका लाल वाणी वय. १३,२.प्रिया लाल वाणी वय २२,३. कुणाल लाल वाणी वय २८,४.कपिल लाल वाणी वय २१,५. कृष्णा लाल वाणी वय ०८ या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. या कामगिरी मध्ये एरऺडवणा , जनता वसाहत च्या फायर गाड्या आणि सेऺट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू व्हॅनची मदत झाली.
अग्निशमन दलाचे ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस संदीप कार्ले यांनी हि कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये