शिवाजीनगर मतदारसंघातील पाण्याच्या तक्रारींचे निराकरण करा
आमदार शिरोळेंच्या प्रशासनाला सूचना

पुणे – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करावे, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केल्या.
आमदार आपल्या दारी अशा अभियानांतर्गत मतदारसंघातील वस्त्या आणि सोसायट्या येथे आमदार शिरोळे यांनी गेले दोन महिने सातत्याने संपर्क साधला. अभियानामध्ये रहिवाशांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींबाबत महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री.पावसकर यांच्यासमवेत व्यापक बैठक घेतली, त्यात विस्तृत चर्चा झाली. पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी़ंचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या सूचना शिरोळे यांनी दिल्या.

या बैठकीला उपमहापौर सुनिताताई वाडेकर, दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका निलिमाताई खाडे, नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका राजश्रीताई काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक आदित्य माळवे, रवींद्र साळेगावकर, प्रतुल जागडे, आनंद छाजेड, मधुकर मुसळे, ओंकार केदारी आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



