पुणे शहर
राधा चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येची पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पाहणी; कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न सुरू – पूनम विशाल विधाते

पुणे : भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांनी आज राधा चौक येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
पूनम विशाल विधाते म्हणाल्या, राधा चौकात होणाऱ्या दररोज वाहतूक कोंडी मुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली पाहिजे. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसोबत या परिसराची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतुकीतील अडथळे तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.लोकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी समन्वय ठेवत आवश्यक ती पावले उचलली जातील. असे पूनम विधाते यांनी सांगितले.










