पुणे शहर

पुणे महापालिका प्रभागरचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर; लवकरच जाहीर होणार प्रभाग रचना

पुणे – महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा गुरुवारी महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्यामुळे, पुढील आठवड्यातच आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येऊन तो अंतिम केला जाण्याची शक्‍यता आहे.

अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र बिनवडे आणि निवडणूक विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाकडे हा दुरुस्ती बदलांसह प्रारूप आराखडा सादर केला आहे.

आयोगाकडून दोन दिवसापूर्वीच निवडणुकांसाठी करोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच आता आयोगाकडे आराखडा सादर झाल्याने लवकरच निवडणूक प्रक्रियाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये