पुणे शहर

बोगस पदविका प्रमाणपत्राबाबत एमआयटीचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा रद्द करावा : पळसकर

युवासेनेकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मान्यता रद्द करण्याची मागणी

पुणे : एम.आय.टी. संस्थेकडुन चालविण्यात येणारा स्कुल ॲाफ टेलिकॉम मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम बोगस असल्याचे नुकतेच उघडकीस आले असुन सदर अभ्यासक्रम हा कानपुर विद्यापीठाशी संलग्न असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना बनावट पदवीका प्रमाणपत्र देण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचा आरोप युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे अनेकांना आपल्या नोकरी गमवाव्या लागल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी न्याय मिळावा म्हणुन नुकतेच एम.आय.टी. संस्थेविरोधात युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. Revoke the university status of MIT which gives bogus diploma certificate

आता युवासेनेने या संस्थेचा अभिमत विद्यापीठ म्हणुन असलेली मान्यता रद्द करावी अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली असल्याचे युवासेनेचे राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी सांगितले. या संस्थेने २००८ ते २०१८ पासुन सदर अभ्यासक्रम राबविला मात्र नुकतेच हा अभ्यासक्रम बोगस असुन याचा कानपुर विद्यापीठाशी दुरान्वयेसुद्धा संबंध नसल्याचे उघडकीस आल्याचे पळसकर यांनी सांगितले आहे. 

पळसकर म्हणाले की,  या संस्थेने अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविताना सदर अभ्यासक्रमाची माहीती अनुदान आयोगाकडे दिली होती. व याआधारे  २०१८ साली अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केला होता. परंतु आता हा अभ्यासक्रमच बोगस निघाल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाची सुद्धा फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे आयोगाने आता या संस्थेचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा रद्द करावा.अशी मागणी युवासेनेकडुन करण्यात आली आहे .यावेळी शिवसेना कोथरुड विभागप्रमुख उमेश भेलके, परेश खांडके ,आनंद भिलारे , गणेश काकडे, युवासेना विभाग अधिकारी राम थरकुडे उपस्थित होते.

Img 20210116 wa0007
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये