रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास तर्फे डहाणूकर व कोथरूड मधील सफाई कामगारांना मोफत दिवाळी किराणा वाटप..

कोथरुड : रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोथरूड मधील सफाई कामगारांना मोफत दिवाळी सणाचे किट्सचे वाटप करून कामगारांचा यथोचित्त सन्मान करण्यास आला.
या उपक्रमाचे कमिन्स हॉल, डहाणूकर कॉलनी येथे रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी कै. मौसमी पूर्णेंदू वैद्य यांचे स्मरणार्थ पूर्णेंदु वैद्य यांचे आर्थिक सहकार्य लाभले. अध्यक्षीय भाषणात अजय मुटाटकर म्हणाले “सफाई कामगार घाणीत राबणारा, स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पुणेकर नागरिकांचे आरोग्याचे रक्षण करणारा आधुनिक काळातील खरा देवदूतच आहे. या देवदूताचे खऱ्या अर्थाने पुजन होणे अतिशय महत्वाचे कार्य आहे.

पुढे ते म्हणाले, सफाई कामगार हा भल्या पहाटे उठून रस्ते सफाई करणे, मयत जनावरे उचलणे, चेंबरमध्ये उतरून गटार साफ करणे, सार्वजनिक शौचालय साफ करणे, विष्ठा उचलणे, प्रत्येक नागरिकाच्या दारोदारी जाऊन कचरा उचलणे इत्यादी स्वरूपाचे कामे करून जनतेची सेवा करतात आणि पुणेकर नागरिक मात्र नविन पेहराव घालून, फटाके वाजवून उत्साहाने दिवाळी साजरा करतात ती रस्त्यावर पडलेली घाण मात्र सफाई कामगार उचलतो. त्यांच्या जीवनात उत्साहाने दिवाळी साजरा करण्याचे भाग्य दिसून येत नाही. भारतीय समाजात विशिष्ठ उच्च शिक्षित वर्गाने रस्ते घाण करायचे, कोठेही कचरा टाकायचा ती घाण मात्र विशिष्ठ समाजातील वर्गाने घाण उचलायची ही प्रवृत्ती बदलणे आवश्यक आहे.



सफाई कामगाराच्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावे, त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून रोटरी सहवास क्लबच्या वतीने दिवाळी भेट म्हणून हे किट्स वाटप करत आहोत. घाणीचे काम करत असताना तसेच वेसनापासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या मुला मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन अजय मुटाटकर यांनी केले.
किरण इंगळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. “सदर किट्सचे वाटप अजय मुटाटकर, किरण इंगळे, पल्लवी इंगळे, प्रतिभा जगदाळे, सुधीर वैद्य या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
सफाई कामगांराच्या सत्काराला उत्तर देताना मोकादम वैजीनाथ गायकवाड असे म्हणाले कि,” सफाई कामगारांना दिवाळी सणाच्या निमित्ताने मोफत किट्स देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सहवासचे आभार. असेच कौतुकाची थाप आपल्यासारख्या संस्थेने द्यावी हे मी आमचे भाग्य समजतो”. सदर कार्यक्रमास आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार मोकादम अण्णा ढावरे व एकूण ७५ कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोह आभार प्रदर्शन वैजीनाथ गायकवाड यांनी केले.






