कोथरुडपुणे शहर

बाळासाहेबांच्या पुण्याविषयी असलेल्या आठवणीला संजय राऊतांनी दिला उजाळा

पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृहाची संजय राऊत यांनी केली पाहणी.

पुणे :  पुणे शहराचे व शिवसेनाप्रमुखांचे एक विशेष नाते होते. या नात्याच्या अनुषंगाने पुणे व बाळासाहेब यांच्या संबंधांवरील निवडक दहा प्रसंगांचे एक स्मृती-दालन कोथरूडमधील शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृहामध्ये उभारण्याबाबत सुचना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते ,नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृह बांधण्यात येत आहे.या नाट्यगृहाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी शिवसेना नेते,शिवसेना संसदिय मंडळाचे नेते,पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना संपर्क नेते,खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.

Img 20201024 wa0166 1

या भेटीच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून,कामाबाबत समाधान व्यक्त केले व हे नाट्यगृह पुणेकर नाट्य-रसिकांसाठी लवकरात लवकर सुरू करावे असे सांगितले.पुणे शहराचे व शिवसेनाप्रमुखांचे एक विशेष नाते होते. या नात्याच्या अनुषंगाने पुणे व बाळासाहेब यांच्या संबंधांवरील निवडक दहा प्रसंगांचे एक स्मृती-दालन उभारण्याबाबत सुचना दिली,तसेच या स्मृती -दालनामध्ये उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अर्धपुतळ्याचीसुद्धा पाहणी केली व त्याबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

Img 20201028 wa0145

या प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे,पिंपरी – चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे,गजानन थरकुडे,राजेश पळसकर,अतुल राजूरकर,युवा-सेना अँड.धर्मराज सुतार,अधीक्षक अभियंता-भवन विभाग  शिवाजी लंके,सहआयुक्त संदीप कदम,उपअभियंता उपेंद्र वैद्य ,सहाय्यक अभियंता विलास मोराळे,कार्यकारी अभियंता -विद्युत योगेश माळी,अभियंता -विद्युत विभाग राजेंद्र गोसावी,शिल्पकार स्वप्निल परदेशी,शिल्पकार संजय परदेशी हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये