दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारत असलेले संजीवन वनोद्यान ठरणार वारजेकरांच्या आरोग्याची संजीवनी

पुणे : वारजे येथे ३५ एकर जागेवर पुणे महानगरपालिका व वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारल्या जात असलेल्या संजीवन वनोद्यानाचे काम जोरात सुरू असून ज्या प्रमाणे येथील वृक्ष वल्ली बहरली जात आहे. त्यावरून हे संजीवन वनोद्यान वारजेकरांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणार आहे.
या वनोद्यानातील कामाच्या प्रगतीची आज माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी पाहणी केली. यावेळी वनोद्यानाचे डिझाईन करणारे डॉ. महेश ठाकूरही उपस्थित होते. दिपाली धुमाळ यांच्या अथक पाठपुराव्यानंतर वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या वनोद्यानाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत अनेक देशी झाडांची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. झाडांना पाणी देण्यासाठी टाक्या बसवण्यात आल्या असून ठिबक सिंचन करण्यात आले आहे. सध्या वनोद्यानाच्या विकासाचे काम अविरत सुरू आहे.










सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांतता मिळावी यासाठी व मोकळी शुद्ध ऑक्सीजन युक्त हवा घेण्यासाठी हे निसर्गरम्य वनोद्यान वारजेकरांसाठी चांगला पर्याय असणार आहे. येथे बनवण्यात येत असलेले पाणवठे, दगडी बंधारे, दगडी जिने , मचान मानला भुरळ घालत आहे. संजीवन वनोद्यानाच्या माध्यमातून एक सुंदर पिकनिक स्पॉट वारजेकरांना मिळणार आहे. वारजेकरांसाठी हे वनोद्यान पर्वणी ठरणार असून यामुळे वारजेतील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळणार आहे. वनोद्यानाच्या वेगाने सुरू असलेल्या कामाबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
संजीवन वनोद्यानात होत असलेले मियावाकी गार्डन म्हणजे काय ?
जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली आहे म्हणून तशा पद्धतीने केलेल्या गार्डनला मियावाकी गार्डन म्हटले जाते. अकिरा मियावाकी यांनी कमी जागेत व कमी वेळेत उत्तम जंगल निर्माण करण्याची ही पद्धत १९७० मध्ये विकसित केली होती. आज भारतात अशा पद्धतीने देशी झाडांची लागवड करून मियावाकी गार्डन केले जाते.



काय आहेत संजीवन वनोद्यानाची वैशिष्ट्ये
• प्रशस्त मुख्य प्रवेशद्वार • वृक्षारोपण/लागवड क्षेत्र
• सहासी सायकल मार्ग • बायो कॉम्पॉस्ट
• स्थानिक वृक्ष यांची लागवड • फुलपाखरू उद्यान
• जमिन वरील सर्वजनशीलता • निसर्ग खेळ क्षेत्र
• मियवाकी वन • बांबू लागवड • स्मृर्ती वन / फायकस वृक्ष लागवड • पवित्र वृक्षचे वृक्षारोपण • खुल्या वातावरणातील व्यायाम शाळ • नक्षत्र वन • पानवठे • माती पाणी संवर्धन ग्याबियन बंधारे व गली प्लग • कलात्मक पानवठे• रॉक गार्ड • चंद्र उद्यान • ओपन अम्पीथिटर • ऑक्सिजन पार्क
• रिसायकल युनिट सुका कचऱ्यातुन टिकाऊ वस्तु निर्मिती
• निसर्ग पाऊल वाट • पदपथांसह सोलर स्ट्रीट दिवे •बायो-टॉयलेटस् आणि सेप्टिक टँक • वन पाणी पुरवठा व पेयजल पुरवठा सुविधा / पाईप लाईन आणि पाणी कनेक्शन • मचाण/वॉच टॉवर / टेहल्नी मनोरा • साईन बोर्ड / मार्गदर्शक फलक • आग संरक्षित रेषा • कव्हर केलेले आसन क्षेत्र






