कोथरुड

कोरोना काळातील नगरसेविका अल्पना वरपे यांचे काम कौतुकास्पद : चंद्रकांत पाटील 

कोरोना योद्ध्यांचा सन्मान व कार्य अहवालाचे प्रकाशन

कोथरुड : परिसरातील विकासकामांबरोबरच लोकप्रतिनिधींनी समाजाप्रती कर्तव्य भावनेतून लोकहिताची कामे केली पाहिजेत असे सांगतनाच कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नगरसेविका अल्पना वरपे यांचे कौतुक केले.

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने कोरोना महामारी काळात समाजाकरिता उल्लेखनीय कामगीरी केलेल्या  डॅाक्टर्स, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, आरोग्य सेवक यांना कोरोनायोद्धा अटल सन्मान देऊन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच  यावेळी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्या २०१७ ते २०२० या काळातील विकासकामांचा कार्य अहवाल दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी  खासदार गिरीश बापट, खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ,भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक, भाजपा युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक सुशिल मेंगडे, कोथरूड अध्यक्ष पुनित जोशी, खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे,नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील, नगरसेविका श्रद्धा प्रभुणेपाठक, हर्षाली माथवड, वासंती जाधव तसेच कोथरूड मतदार संघ व खडकवासला मतदार संघाचे व प्रभाग  १० चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका अल्पना वरपे यांनी प्रास्ताविकपर भाषणात आपण पक्षाच्या परंपरेनुसार मी केलेल्या कामाचा लेखाजोखा या कार्यअहवाल दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिकांपुढे सादर करित असून प्रभागाच्या विकासाकरिता कटिबद्ध आहे असे सांगितले.

Img 20201213 wa0074

खासदार गिरीशजी बापट यांनी  दिनदर्शिकेच्या स्वरूपात असलेल्या कार्यअहवालाच्या संकल्पनेबाबत कौतुक केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन स्विकृत सभासद वैभव मुरकुटे यांनी केले तर आभार प्रभाग अध्यक्ष सागर कडू यांनी मानले.याकार्यक्रमाचे संयोजन भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस अॅड.गणेश वरपे व नगरसेविका अल्पना वरपे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये