पुणे शहरपुणे शहर, जिल्हा

पुण्यातील रंगावली कलाकार शनेश्वर खराडे यांचे रांगोळीतून अजितदादांना अभिवादन!!!

बारामती येथे “आठवणीतले दादा” रांगोळी प्रदर्शनात त्यांनी साकारली दादांची एक अविस्मरणीय कलाकृती

बारामती (पुणे) : प्रत्येक रंगात एक भावना आहे, प्रत्येक रेषेत एक आठवण आहे, आणि प्रत्येक स्पर्शात मनापासून व्यक्त केलेला आदर आहे.

अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी शनेश्वर खराडे यांनी एक कलाकृती साकारली. रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी दादांना जयंती दिनी अभिवादन केले.
रांगोळी ही केवळ कला नसते, तर ती कलाकाराच्या मनातल्या भावना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करणारी एक सुंदर भाषा असते. या कलाकृतीतून “दादा” यांच्याविषयीचा सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे.

ही रांगोळी साकारताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत दिसलेलं कौतुक आणि चेहऱ्यावरचं समाधान हेच आमच्या कलेचं खरं यश आहे, असं मत त्यांनी मांडले.

काही भावना शब्दांत व्यक्त होत नाहीत… त्या फक्त मनापासून अनुभवाव्या लागतात… म्हणून… निशब्द! असंही ते म्हणाले.

Img 20260222 wa00063491038201882637992

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये