पुणे शहर

पुण्यात रक्तदानातून अजितदादांना अभिवादन!!!

166 कार्यकर्त्यांचा सहभाग

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला रंगमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादा पवार यांच्या कार्याचे स्मरण करीत 166 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून दादांना अभिवादन केले.


रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष -माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच स्व. अजितदादा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजक आनंद सरवदे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेवक हर्षल (रवी) टिंगरे, नगरसेविका नंदिनीताई धेंडे, नगरसेविका शितलताई सावंत, माजी नगरसेविका उषाताई कळमकर, मीनलताई सरवदे, माजी नगरसेवक संदीप जऱ्हाड, राष्ट्रवादीचे मनोज पाचपुते, किरण खैरे, शशीअण्णा टिंगरे, बंडू खांदवे, मिलिंद खांदवे, नानासाहेब आबनावे, अर्जुन गरुड, विजय गलांडे, स्वप्निल पठारे, रावसाहेब खंडागळे, आदिनाथ गायकवाड, शैलेंद्र भोसले, निखिल गायकवाड, असलम शेख, गणेश देवकर, विल्सन चंदेवळ,अजित गंगावणे, अरुण बेंगळे, रुपेश गायकवाड, शेखर हरणे, निलेश वायदंडे,संदीप मिसाळ, तुकाराम गवळी, विजय घेनंद, वंदना साळवी, ज्योती चंदेवळ,अनहिता कपूर,गीतांजली सरगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जनसेवा ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

Img 20260222 wa00063491038201882637992

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या कार्याचे स्मरण करून कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

Image editor output image 1660286599 1784741260210302771019684004970
Image editor output image 1657516036 17847411664188663704553592203623
Image editor output image438657733 17847414345433691928264874565276
रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये